कात टाकणार टपाल खाते; २४ तास मिळणार सेवा

post
नवी दिल्ली – आपल्याला लवकरच पोस्ट ऑफिसमधूनही बँकांसारख्या ऑनलाईन सेवा मिळणार असल्यामुळे आपण पोस्ट ऑफिस खात्याला २४ तास हाताळू शकता. यामध्ये पोस्ट ऑफिस खात्यातून रक्कम हस्तांतरण, मोबाईल बँकिंगसह अनेक सेवा मिळणार आहेत. देशातील २५ हजार मुख्य ऑफिसमधील जवळपास २१ हजार पोस्ट ऑफिस आता कोअर बँकिंग प्रणालीशी जोडले गेले असून त्याचा मोठा फायदा पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणा-यांना होणार आहे.

भारतीय टपाल खात्याकडे देशभरात जवळपास २५ हजार विभागीय पोस्ट कार्यालये असून यामधील १२ हजार छोटय़ा शहरात आणि ग्रामीण भागात आहेत. मार्च २०१६पर्यंत जवळपास २१ पोस्ट कार्यालये सीबीएस प्रणालीशी जोडण्यात आली आहेत. लवकरच सर्व २५ हजार कार्यालयांना सीबीएसशी जोडण्यात येणार आहे. यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱया धारकांना बँकेप्रमाणे सेवा मिळणार आहेत.

पोस्ट ऑफिस ग्राहकांना बँकेच्या ग्राहकांना ज्या सेवा मिळतात त्या सर्व मिळणार आहेत. याच्या अंतर्गत बचत खाते, ऑनलाईन रक्कम हस्तांतरण, आरडी खात्यापासून इतर सर्व प्रकारच्या खात्यांना जोडण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांचा मोठय़ा प्रमाणात वेळ वाचणार आहे.

Leave a Comment