सर्वात लवचिक कॅमेरा तयार करण्यात संशोधकांना यश

camera
वॉशिंग्टन : अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात भारतीय अमेरिकी संशोधकाच्या नेतृत्वाखाली रोजच्या जीवनातील पदार्थाना गुंडाळून छायाचित्रे घेता येतील असा कॅमेरा तयार करण्यात आला असून आताच्या पारंपरिक कॅमे-यांच्या मदतीने याप्रकारे प्रतिमा घेता येत नाहीत. आज जे कॅमेरे अस्तित्वात आहेत ते जग एकाच अवकाशिबदूतून पकडतात. कॅमेरा उद्योगाने कॅमे-याच्या आकारात बरेच बदल केले असून तो अगदी सूक्ष्म पातळीवर आणला आहे, त्यामुळे प्रतिमाचित्रणाचा दर्जा वाढला आहे.

आपण वेगवगेळे प्रयोग करू शकतो आहोत पण आम्ही यात केलेले संशोधन वेगळ्या प्रकारचे आहे, असे कोलंबिया विद्यापीठाचे संगणक विज्ञान विभागाचे प्राध्यापक के. नायर यांनी सांगितले. कॅमे-याचे अनेक उपयोग असतात, पण कॅमे-याची घडी घालता येण्याची कल्पना कुणी केली नव्हती ती आम्ही प्रत्यक्षात आणली आहे, असे रांची येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत शिकलेल्या नायर यांनी सांगितले. त्यांच्या चमूने लवचिक कॅमेरा तयार केला आहे. जेव्हा कॅमेरा वस्तूभोवती गुंडाळला जातो तेव्हा प्रकाशीय गुणधर्म त्यानुसार घेतले जातात.

प्राप्त प्रकाशीय स्थितीत उच्च प्रतीची प्रतिमा किंवा छायाचित्र यात घेतले जाते. ही चित्रण यंत्रणा स्वस्तात तयार करता आली तर कधी न शक्य झालेल्या प्रतिमा घेता येतील. यात प्लास्टिक किंवा इतर काही धागे वापरता आले तर खर्च कमी करणे शक्य आहे. परिस्थितीनुसार समायोजित होत असलेले भिंग हे यात महत्त्वाचे असते त्यामुळे लवचिक पृष्ठभागाचे कॅमेरे तयार करता येतील. लार्ज फॉर्मेट डिटेक्टर तयार करणे ही यातील पुढची पातळी आहे. दोन तंत्रज्ञानांचे मिश्रण करून यात नवीन कॅमरे तयार करता येतील ते विविध उपयोगांसाठी वापरता येतील. हे तंत्रज्ञान १३ ते १५ मे दरम्यान नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी येथील कॉम्प्युटेशनल फोटोग्राफी परिषदेत सादर केले जाणार आहे.

Leave a Comment