सलग दुस-या वर्षी गुगल इंडियाला रँडस्टॅड पुरस्कार

google
पुणे – सलग दुस-या वर्षी रँडस्टॅड अवॉर्ड २०१६ पुरस्कार गुगल इंडियाने पटकावला आहे. ही निवड करताना सर्वेक्षणातून वेतन आणि कर्मचा-यांच्या सुविधा, दीर्घकालीन नोकरीची हमी, कंपनीची आर्थिक सुस्थिती, कामाचे आनंददायी ठिकाण आणि कामाचा-आयुष्याचा समतोल हे प्राधान्यक्रम समोर आले. या सर्वेक्षणाबाबत रँडस्टॅड इंडियाचे सीईओ डॉ. मूर्थी के. उप्पलुरी म्हणाले, नव्या हुशार लोकांना नोकरी देणे, त्यांना कंपनीच्या प्रगतीसाठी गुंतवणे आणि त्यांच्याकडील मूळ गोष्टींचा उपयोग करून घेणे याला नोकरीच्या बाजारपेठेत गती आली आहे.

Leave a Comment