युजरच्या हृदयांवर फेसबुक लाईट विराजमान

facebuk
जगात सध्या सोशल नेटवर्कींग साईटमध्ये लोकप्रियतेत आघाडीवर असलेल्या फेसबुकला कुठली साईट मागे टाकेल असा प्रश्न विचारला तर कदाचित कुठलीच नाही असे उत्तर येण्याची शक्यता जास्त आहे. मात्र फेसबुकला या बाबतीत एक स्पर्धक निर्माण झालां आहे तो आहे फेसबुक लाईट ही साईट. या साईटने फेसबुकला लोकप्रियतेच्या बाबतीत चांगलीच टक्कर दिली आहे.

जून २०१५ मध्ये म्हणजे अवघ्या ९ महिन्यांपूर्वी फेसबुकची ही साईट लाँच झाली व सध्या तिचे जगात १० कोटी युजर्स आहेत. ज्या वेगाने तिची युजर संख्या वाढते आहे ते पाहता ती मूळ फेसबुकला लवकरच मागे टाकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फेसबुकचेच व्हर्जन असलेल्या या साईटमध्ये कमी डेटा वापरून फेसबुकचा वापर करता येतो. कनेक्शन स्लो असले अथवा स्पीड कमी असला तरी फरक पडत नाही. युरोप देश, लॅटिन अमेरिका, आफ्रिका, आशियातील १५० देशात,५० हून अधिक भाषा बोलणारे कोटयावधी युजर फेसबुक लाईटचा वापर करत आहेत.

Leave a Comment