मोटोरोलाचा एक्स फोर्सची किंमतीत भरघोस कपात

moto-x
मुंबई – मोटोरोलाने आपल्या रफ-टफ स्मार्टफोन मोटो एक्स फोर्सच्या किंमतीत भरघोस कपात केली असून कंपनीने या फोनला शटरप्रूफ म्हणत लॉन्‍च केले होते म्हणजेच उंचावर जरी हा मोबाईल पडला तरी त्याची स्‍क्रीन फुटणार नाही. जगभरातील तंत्रज्ञानविषयक तज्ज्ञांकडून या स्मार्टफोनचं कौतुक झालं आहे.

फेब्रुवारीत लॉन्च झालेल्या मोटो एक्स फोर्स या स्मार्टफोनची किंमत ४९ हजार ९९९ रुपये होती. मात्र, आता मोटोरोलाने या स्मार्टफोनच्या किंमतीत १६ हजार रुपये एवढी मोठी कपात केली आहे. १६ हजार रुपयांच्या सवलतीसह मोटो एक्स फोर्स स्मार्टफोन फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून खरेदी करता येणार आहे.

मोटो एक्स फोर्सच्या किंमतीत कपात केल्यानंतर आता ३२ जीबी व्हेरिएंट ३४ हजार ९९९रुपयांना, तर ६४जीबी व्हेरिएंट ३७ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे. मोटो एक्स फोर्स अधिकाधिक फीचर्स मोटोच्या याआधीच्या मोटो एक्स स्टाईल या स्मार्टफोनसारखेच आहेत. मोटो एक्स फोर्सचे वैशिष्ट्य आणि आकर्षणाची गोष्ट म्हणजे प्रोसेसर. त्याचसोबत ब्रेक प्रूफ आणि पूर्णपणे वॉटर प्रूफ हेही या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य आहेत. टचस्क्रीनला दोन लेयर असल्याने स्क्रीन सुरक्षित राहण्यास मदत होते. ५.४ इंचाचा एचडी डिस्प्ले असून ३ जीबी रॅम, त्यासोबत ग्राफिक्ससाठी एडरेनो ४३० GPU लावण्यात आळे आहे. फोटोग्राफीसाठी २१ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि सेल्फीप्रेमींसाठी ५ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ३७६० mAh क्षमतेची बॅटरी असून, ३० तासांपर्यंत बॅटरी बॅकअपचा दावा मोटोरोलाने केला आहे.

Leave a Comment