फोर्ड ४२३०० कार रिकॉल करणार

ford
सॉफटवेअरमधीर गडबडीमुळे अमेरिकन कार उत्पादक कंपनी फोर्ड भारतात हचबॅक फिगो व कॉम्पॅक्ट सेदान फिगो एक्स्पायरच्या ४२३०० कार रिकॉल करत आहे. सॉफटवेअरमधील गडबडीमुळे गाडीची टक्कर झालीच तर एअरबॅग्ज नीट काम करत नसल्याचे दिसून आल्यामुळे या कार रिकॉल केल्या जात आहेत. सॉफ्टवेअरमधील दुरूस्ती करून त्या परत केल्या जाणार आहेत. ही दुरूस्ती विना चार्ज केली जात असल्याचे जाहीर केले गले आहे.

कंपनीच्या साणंद येथील प्रकल्पात सुरवातीपासून ते १२ एप्रिल २०१६ पर्यत बनलेली ही दोन मॉडेल्स रिकॉल केली जात आहेत. या सर्व गाड्यांतील सॉफ्टवेअर अपग्रेड केले जाणार आहे. इतकेच नव्हे तर डिलरकडे असलेल्या गाड्यांतील सॉफ्टवेअरचीही तपासणी केली जाणार आहे. यापूर्वी कंपनीने २०१३ साली १,६६००० फिगो फिएस्टा क्लासिक या गाड्या रिकॉल केल्या होत्या तसेच गतवर्षी १६४४४ इको स्पोर्ट एसयूव्हीही रिकॉल केल्या होत्या.

Leave a Comment