नवी दिल्ली – परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर तिथेच आपले बस्तान बसवू पाहणाऱ्या डॉक्टरांसाठी एक खास बातमी आहे. आतापर्यंत भारत सरकार सहजपणे ही एनओसी म्हणजे नाहरकत प्रमाणपत्र देत होते पण यावर मोदी सरकारने अंकुश लावला आहे.
परदेशात राहू इच्छित डॉक्टरांना मिळणार नाही NOC
देशातील डॉक्टरांची संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हे निश्चित केले आहे की, आता यापुढे अशा डॉक्टरांना NOC देण्यात येणार जे कायमस्वरूपी परदेशात आपले बस्तान बसवू पाहत आहेत. दर वर्षी मोठ्या संख्येत डॉक्टर परदेशात खासकरून अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात आणि तेथे पदवी घेऊन तेथील कोणत्यातरी अस्थापनेतच सेवा देऊ लागतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली.
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही