जगातली सर्वात वेगवान एसयूव्ही बेंटेगा भारतात आली

bentega
लग्झरी कार उत्पादक कंपनी ब्रिटीश बेंटले ची पहिली लक्झरी एसयूव्ही बेंटेगा भारतात दाखल झाली आहे. या गाडीच्या किंमती ३ कोटी ८५ लाखांपासून सुरू होत आहेत. ही जगातील सर्वात मजबूत, वेगवान व महाग एसयूव्ही आहे.

या गाडीचे डिझाईन वेगळे आणि आकर्षक करण्यात डिझायनर्स संपूर्ण यशस्वी झाले आहेत. मात्र स्प्लीट सर्क्युलर हेडलँप, मोठी मॅश ग्रील व बारीक कॅरेटर लाईन्स पारंपारिक बेंटलीची झलक दाखवितात. यूकेमध्ये तयार झालेली ही एसयूव्ही ० ते १०० किमीचा वेग ४ सेकंदात घेते व तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३०१ किलोमीटर. या गाडीला डब्ल्यू १२ हे १२ सिलींडरवाले सर्वात अॅडव्हान्स इंजिन दिले गेले आहे.

गाडीचे इंटिरियर हँड क्राफ्टेड वूड व लेदरचा वापर करून बनविले गेले आहे. यात चार सीटर व पाच सीटर अशी दोन ऑप्शन्स आहेत. १७ स्टँडर्ड कलर्सशिवाय ९७ कलर शेड ऑप्शन्स ग्राहकाला उपलब्ध करून दिली गेली आहेत. इलेक्ट्रॅानिक नाईट व्हिजन ची सुविधा आहे. यात समोरच्या वस्तू इंन्फ्रारेड तंत्रज्ञानाच्या मदतीने ओळखल्या जातात. गाडीत आठ इंची टचस्क्रीन असून त्याच्या सहाय्याने नेव्हीगेशनही करता येते. प्रवाशांच्या मनोरंजनाच्या दृष्टीनेही अनेक सुविधा दिल्या गेल्या आहेत.

Leave a Comment