जगातील पहिले न्यूड रेस्टॉरंट लंडनमध्ये

buniyad
लंडन – लंडनमध्ये लवकरच एक न्यूड रेस्टॉरंट सुरु होणार असून ११ हजार लोकांनी ज्यासाठी नोंदणीदेखील केली आहे. ‘बुनियादी’ असे लंडनमध्ये सुरु होणा-या या रेस्टॉरंटचे नाव ठेवण्यात आले आहे. हे रेस्टॉरंट जूनमध्ये लोकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

दोन भागात हे रेस्टॉरंट विभागले असणार आहे. ज्यांना कपडे घालून रेस्टॉरंटमध्ये जेवायचे आहे त्यांच्या बसण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. तर नग्न असणा-यांना वेगळी जागा असणार आहे. रेस्टॉरंटमध्ये ४२ लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच हस्तनिर्मित भांड्यांवर जेवण वाढण्यात येणार आहे. रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे जेवण मिळणार आहे. येथे लोकांना कोणतीही भेसळ नसलेली मस्ती करायला मिळायला हवी. कोणतीही कृत्रिम गोष्ट नसलेला अनुभव मिळावा. ज्यामध्ये कोणताही रंग, केमिकल, वीज, गॅस, फोन यांच्यासोबतच इच्छा असेल तर कपडेही नसावेत. त्यांना ख-या स्वातंत्र्याचा अनुभव मिळावा ही यामागची संकल्पना असल्याचे, रेस्टॉरंटचे मालक सेब लिआल यांनी सांगितले आहे.

ग्राहकांसमोर येणारी प्रत्येक गोष्ट नग्न असावी अशी जागा बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली आहे. रेस्टॉरंटमध्ये कोणत्याही प्रकारचा देखावा करण्यात आलेला नाही. बांबू आणि मेणबत्तीचा फक्त वापर करण्यात आला आहे. आमच्यासाठी हे खूपच आव्हानात्मक होते, आम्ही खूप उत्साहित असल्याचे सेब लिआल यांनी म्हटले आहे. या रेस्टॉरंटमध्ये येणा-या प्रत्येक व्यक्तीला तिकीट दिले जाणार असून प्रथम येईल त्याला प्राधान्य देण्यात येईल. यासाठी रेस्टॉरंटच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करावे लागणार आहे. रेस्टॉरंटमध्ये येणा-या ग्राहकांना चेंजिंग रुम आणि लॉकर्सची सुविधा देण्यात येणार आहे. ग्राहकांना आपल्या टेबलावर पोहाचेपर्यंत घालण्यासाठी कपडे देण्यात येणार आहेत. या रेस्टॉरंटमध्ये फोटो काढायला परवानगी नसणार आहे.

Leave a Comment