चीनमध्ये बनली पहिली रोबोट गर्लफ्रेंड

china
बीजिंग – चीनमध्ये एक असा रोबोट बनवण्यात आला आहे, जो अॅपलच्या क्‍लाउड सर्व्हिस आइक्‍लाउड द्वारा प्राप्त संदेश आणि आदेशानुसार काम करतो. जिया-जिया नामक या रोबोटला एका मुलीच्या रूपात बनवण्यात आले आहे आणि या रोबोटचा गर्लफ्रेंडच्या नावाने प्रचार केला जात आहे.

या रोबोट गर्लफ्रेंडला बनविण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागला असून नुकतेच या रोबोटला सादर करण्यात आले आहे. जिया-जियाचे वैशिष्ट्य म्हणजे याला आइक्‍लाउडच्या माध्‍यमातून आदेश दिले जाऊ शकतात. एवढेच नाही तर हा रोबोट माणसांशी बातचीत देखील करू शकतो. त्याचबरोबर या रोबोटच्या समोर आपण कॅमेरा घेऊन उभे राहिल्यास हा रोबोट फोटो काढण्यासाठी देखील तयार होतो.

प्रसारमाध्यमांच्या समोर जिया-जियाला सादर केले असता तिथे उपस्थित कॅमरामनला पाहून या रोबोटने कॅमरामनला फोटो काढण्याचा एंगल असा असेल तरच फोटो सुंदर येईल असे सांगितले.

Leave a Comment