१६ मेगापिक्सल कॅमेर्‍यासह लॉन्च होणार सोनीचा एक्सपिरिया एम अल्ट्रा

sony
मुंबई – इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या सोनी या कंपनीचा येणार स्मार्टफोन एक्सपीरिया एम अल्ट्रा दमदार फीचर्ससोबत लॉन्च होऊ शकतो. याबाबत एक वैशिष्ट्य म्हणजे याफोनमध्ये सेल्फीसाठी खास १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. एक्सपीरिया एम अल्ट्रामध्ये ६ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असेल तसेच यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६५२ प्रोसेसर देण्यात आला आहे. २३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, फिंगरप्रिंट सेंसर, यूएसबी टाइप-सी, क्वालकॉम चार्जिंग टेक्नॉलॉजी, ४२८० एमएएच क्षमतेची बॅटरी , ३ जीबी रॅम त्याचबरोबर ३२जीबीची इनबिल्ट स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे.

Leave a Comment