यामाहाची सिग्नस रे-झेडआर स्कूटर लॉन्च

yamaha
नवी दिल्ली – दुचाकी उत्पादक कंपनी यामाहाने आपली सिग्नस रे-झेडआर स्कूटर लॉन्च केली आहे. दिल्लीत याचे ड्रम ब्रेक व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत ५२ हजार आणि डिस्क ब्रेक व्हर्जनची किंमत ५४,५०० रुपये आहे.

सिग्नस रे-झेडआर या स्कुटरला मुलांची रिअल नेक्स्ट-जेन स्कूटरचा दर्जा देण्यात आला आहे. ही स्कुटर मे महिन्यापासून बाजारात उपलब्ध होईल. या स्कुटरमध्ये ११३ सीसी एअर-कूल्ड ४-स्ट्रोक इंजिन देण्यात आले आहे. ही स्कुटरमध्ये एसओएचसी, २-व्हाल्व ब्ल्यू कोर इंजिन आहे, जे सर्वाधिक ७बीएचपी पॉवर आणि ८.१ एनएम टॉर्कची निर्मिती करण्यात सक्षम आहे. या स्कुटरचे वजन १०३ किलो असल्यामुळे मायलेज ६६ किलोमीटर प्रति लीटर देते. सीट खाली २१ लीटरची क्षमता असलेली फ्यूल टाकी, ट्यूबलेस टायर आणि नवीन इंस्ट्रूमेंट क्लस्टरची विशेषता आहे.

Leave a Comment