मुंबई : मायक्रोमॅक्सने मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टीमने सज्ज असलेला नवा आणि स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. मायक्रोमॅक्सचा हा नवा स्मार्टफोन कॅनव्हास सीरिजमधील असून मायक्रोमॅक्स कॅनव्हास स्पार्क २ प्लस असे या स्मार्टफोनचे नाव आहे आणि याची किंमत फक्त रू. ३९९९ आहे. हा स्मार्टफोन फक्त स्नॅपडीलवरच उपलब्ध होणार आहे.
मायक्रोमॅक्सचा मार्शमेलो ओएसवर चालणारा नवा स्मार्टफोन
कंपनीने याआधीच मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास ६ आणि कॅनव्हास ६ प्रो या हायएन्ड स्मार्टफोनच्या लाँचिंग कार्यक्रमात स्पार्क २ प्लस लवकरच लाँच करणार असल्याचे जाहीर केले होते. पहिल्यांदाच स्मार्टफोन वापरणाऱ्या यूजर्ससाठी हा अतिशय स्वस्तातला स्मार्टफोन मायक्रोमॅक्सने लाँच केला आहे. पहिल्यांदाच स्मार्टफोन वापरणाऱ्या यूजर्ससाठी मार्शमेलो या सर्वात अद्ययावत ओएसने सज्ज असलेला स्पार्क २ प्लस मेटॅलिक ग्रे, कॉपर गोल्ड आणि शँपेन गोल्ड अशा तीन रंगात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
स्पेसिफिकेशनच्या बाबतीत सांगायचे झाले तर मायक्रोमॅक्स कॅनव्हास स्पार्क २ प्लस स्मार्टफोनला ४८०X८५४ पिक्सेलचा FWVGA प्रकारातील पाच इंची डिस्प्ले आणि १.३GHz क्षमतेचा क्वाडकोअर प्रोसेसर आहे. तसेच स्पार्क २ प्लसमध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने ही मेमरी ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. या स्मार्टफोनचा रिअर म्हणजे मुख्य कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा तर फ्रंट म्हणजे सेल्फी कॅमेरा २ मेगापिक्सेलचा आहे. मायक्रोमॅक्स कॅनव्हास स्पार्क २ प्लसची बॅटरी २००० mAh क्षमतेची आहे. तसेच कनेक्टिव्हिटी जीपीआरएस, ईडीजीई आणि ३जी स्पीडने इंटरनेट वापरता येणार आहे. तसेच ब्लूटूथ, वायफाय आणि मायक्रोयूएसबी ही संपर्क व्यवस्था या स्मार्टफोनसोबत आहे. हा स्मार्टफोन फक्त स्नॅपडील या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरच उपलब्ध होणार आहे.