जिवीने आणले कमी किमतीचे तरीही मस्त फोन

jivi
कमी किंमत, चांगली स्पेसिफिकेशन शिवाय एलईडी बल्ब फ्री अशी स्कीम जिवी मोबाईल्स मॅजिकॉन इम्प्रेस प्रायव्हेट लिमिटेड मोबाईल डिव्हीजनने राबविली असून त्या अंतर्गत ६९९ रूपयांपासून ते ११९९ रूपयांपर्यंतचे मस्त फोन कंपनी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहे. या फोनमध्ये स्टाईल, डिझाईन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम संयोग साधला गेला आहे.

कंपनीचे सीईओ पंकज आनंद या संदर्भात म्हणाले की आमच्या युजरचे बजेट लक्षात घेऊन आम्ही आमचे स्मार्टफोन सादर केले आहेत. ६९९ ते ११९९ या किंमतीत सात फोन सादर केले गेले आहेत. हे सर्व फोन्स व चार्जर आयएसआय मान्यताप्राप्त आहेत. हे मेक इन इंडिया फोन दिल्लीतील युनिटमध्ये तयार केले गेले आहेत. यात दुप्पट बचत व दुप्पट फायदा ग्राहकांना होणार आहे. कारण प्रत्येक फोनसोबत ९ वॅटचा एलईडी बल्ब मोफत दिला जाणार आहे. ही योजना पंतप्रधान मोदींच्या प्रकाश पथ मोहिेमेनुसार आहे. कारण यात सर्वसामान्य माणसांना वीज व पैसे बचत अशी दोन्ही उदिष्ठे साध्य करता येणार आहेत.

Leave a Comment