‘आयटी’वाल्यांच्या नोकऱ्या २० टक्क्यांनी घटणार!

it-sector
मुंबई – माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना निराश करणारी बातमी आहे. या क्षेत्रातील नोकऱ्यांच्या चालू आर्थिक वर्षात उपलब्धतेत २० टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज ‘नॅसकॉम’ने वर्तविला असून ‘ऑटोमेशन’वर या क्षेत्रातील देशातील दोन दिग्गज कंपन्या इन्फोसिस आणि टीसीएसने भर दिल्यामुळे त्याचा परिणाम नोकऱ्यांच्या उपलब्धतेवर होईल, असे नॅसकॉमच्या अहवालात म्हटले आहे.

नॅसकॉमने गेल्यावर्षी जूनमध्ये २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये २.७५ लाख नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असा अंदाज वर्तविला होता. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षामध्ये तो २.३० लाख इतका होता. याबाबत नॅसकॉमचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी म्हणाले की, देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा एकूणच १० ते ११ टक्क्यांने या आर्थिक वर्षात विकास होईल. डिजिटल क्षेत्रामध्ये आता ऑटोमेशनला महत्त्व येऊ लागले आहे. ऑटोमेशन वाढू लागल्यामुळे साहजिकच रोजगाराच्या संधी कमी होऊ लागणार आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत विचार केला तर नोकरीच्या संधी कमी होणार आहेत. पण त्याचा कंपन्यांच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment