आता फेसबुकद्वारे कमवा पैसे

facebook
मुंबई – सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक आता मित्र जोडण्याचे साधन राहिले नसून पैसे कमावण्याचे देखील साधन बनले आहे. एका रिपोर्टनुसार फेसबुक यूजर्स आपल्या पोस्टद्वारा आता पैसे देखील कमावू शकतात.

एका सर्वेक्षणा दरम्यान ही बाब समोर आली असून फेसबुक आता आपल्या यूजर्सला पैसे कमवण्याचा विकल्प देण्याचा विचार करत आहे. पण सध्या तरी फेसबुक हे फीचर आपल्या सरसकट यूजर्सला देते की आपल्या शास्वत यूजर्सला देते.

दरम्यान फेसबुकने आपल्या मॅसेंजर अॅपमध्ये ग्रुप कॉलिंग फीचर सुरु केले आहे. या फीचर द्वारे फेसबुक मॅसेंजर यूजर आपल्या कोणत्याही ग्रुपमध्ये एकाच वेळी ५० जणांशी कॉल करू शकतात. साहजिकच हा कॉल इंटरनेटच्या माध्यमातूनच होणार आहे. ही सुविधा सर्व अँड्रॉईड आणि आयओएस स्मार्टफोनसाठी विनामुल्य ठेवण्यात आले आहे. कॉल करतेवेळी ग्रुपच्या त्या सदस्यांना आपल्याला जोडावे लागेल जे आपल्या ग्रुपमध्ये आहेत. जर कोणी सदस्य हा कॉल मिस करेल, तर तो पुन्हा मध्येच येऊन आपल्याशी जोडू शकतो. कॉलिंगदरम्यान कोणानव्या सदस्याला देखील आपल्याला जोडता येऊ शकते.

Leave a Comment