अमेरिकी डॉलरवर प्रथमच झळकणार महिलेची छबी

tuman
अमेरिकेचे वित्तमंत्री जेकब यांनी बुधवारी २० डॉलर्स किंमतीच्या नोटेवर इतिहासात प्रथमच महिलेची छबी झळकणार असल्याचे घोषित केले आहे. महिला गुलामी विरोधात ऐतिहासिक लढा देणार्‍या हेरएट टबमेन या महिलेची प्रतिमा २० डॉलर्सच्या नोटेवर असेल. नवीन डिझाईनच्या या नोटेवर व्हाईट हाऊस, राष्ट्राध्यक्ष अॅंड्रू जॅक्सन यांच्या प्रतिमाही असणार आहेत.

गतवर्षी जूनमध्ये अमेरिकी चलनावर महिला प्रतिमा छापण्याबाबतच्या योजनेची माहिती जाहीर केली गेली होती. त्यानुसार १० डॉलरच्या नोटेवर अलेक्झांडर हेमिल्टन यांच्या जागी एखाद्या ऐतिहासिक कामगिरी बजावलेल्या महिलेची छबी छापण्यात येणार असल्याचे घोषित केले गेले होते. मात्र त्याला समाजाच्या सर्व थरातून कडक विरोध झाला कारण हेमिल्टन हे अमेरिकेचे पहिले अर्थमंत्री होते व अमेरिकेच्या अर्थकारणाला आकार देण्यात त्यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामळे त्याचा फोटो हटविण्यास विरोध झाला होता. त्यानंतर नोटेच्या एका बाजूला अलेक्झांडर हेमिल्टन व दुसर्‍या बाजूवर ऐतिहासिक मोर्चा व महिलांना मतदान अधिकार मिळण्यासाठी आंदोलनात उतरलेल्या महिलांची छबी छापण्याचा निर्णय घेतला गेला होता.

Leave a Comment