शतकातील सर्वात मोठा हिरा बोत्सवानाच्या खाणीत सापडला

diamond
गॅबोरोन – जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा आफ्रिकी देश बोत्सवानाच्या एका खाणीत सापडला आहे. हा हिरा मागील १०० वर्षांतील सर्वात मोठा हिरा असल्याचे (११११ कॅरटची उच्च गुणवत्ता) सांगितले जात आहे.

जगात हिरे उत्पादकांमध्ये बोत्सवाना दुस-या स्थानावर असीम कॅनडाची कंपनी लुकारा डायमंड कॉर्पोरेशनने १०० वर्षांनंतर मिळालेल्या या हि-यावर दावा केला आहे. हा हिरा राजधानी गॅबरोनच्या उत्तरेस ५०० किलोमीटर अंतरावर स्थित करावे खाणीत सापडला. हा हिरा शतकातील सर्वात मोठा शोध आहे, परंतु अजून याचे मूल्यांकन व्हायचे असल्याचे कंपनीने सांगितले.

लुकारा डायमंड कॉर्पोरेशननुसार हा हिरा १९०५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या कुलिनन डायमंडनंतर जगाचा दुसरा सर्वात मोठा हिरा आहे. कुलिनन हिरा दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरियानजीक एका उत्खननात मिळाला होता. तो ३१०६ कॅरेटचा होता. तो हिरा कापून ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका आणि लॅस्सर स्टार ऑफ आफ्रिका बनविण्यात आला, जो सध्या ब्रिटनच्या शाही खजिन्यात आहे. कुलिनन हि-याला ९ तुकडय़ांमध्ये कापण्यात आले होते. यातील अनेक तुकडे ब्रिटिश क्राउनमध्ये समाविष्ट आहेत.

याआधी १९०५ मध्ये लुकारा डायमंडला कुलिनन हि-यापेक्षा काहीसा लहान हिरा मिळाला हेता. स्टॉकहोममध्ये नोंदणीकृत या कंपनीनुसार हिऱयाची गुणवत्ता अतिशय उत्कृष्ट आहे. हा हिरा सापडल्यानंतर कंपनीच्या स्टॉक्समध्ये ३४ टक्क्यांची तेजी पाहावयास मिळाली.

Leave a Comment