वर्षअखेरीस येणार पहिली भारतीय इलेक्ट्रीक बाईक

T6X
पुणे: संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विजेवर चालणारी बाईक विकसित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘टॉर्क मोटरसायकल्स’ या ‘स्टार्ट अप’ कंपनीने या वर्षाच्या अखेरपर्यंत ‘टी ६ एक्स’ ही पहिली बाईक सादर करण्याची घोषणा केली आहे.

ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर १०० किलोमीटर प्रवास करू शकते. या गाडीमध्ये क्लाउड कनेक्टिव्हिटी, फोन चार्जिंग आणि जीपीएस अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘ऑल डिजिटल डिस्प्ले युनिट’ वरून चालकाला आवश्यक असलेली सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. क्लाउड कनेक्टिव्हिटीद्वारे जवळच्या चार्जिंग सेंटरची माहिती मिळू शकणार आहे.

काही दिवसांपूर्वी कंपनीने या गाडीचा आराखडा सदर केला होता. सध्या या गाडीचे उत्पादन आणि तिची नोंदणी यावर काम सुरू आहे. सरकारकडून सहकार्य मिळाले तर हे गाडी अधिक लवकर भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल; असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

‘टी ६ एक्स’ ही बाईक या वर्षाच्या अखेरपर्यंत सादर करण्यात येणार असली तरीही प्रत्यक्षात उत्पादन करून ही गाडी सन २०१७ च्या मध्यापर्यंत बाजारात आणण्यात येईल; असेही कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Comment