बनावट उत्पादनांमुळे नामवंत ब्रँडस ना मोठा फटका

duplicate
नावात किरकोळ फेरबदल अथवा डुप्लीकेट उत्पादने बनविणार्‍यांमुळे नामवंत ब्रँडस कंपन्यांना दरवर्षी किमान ४६२ अब्ज डॉलर्सचा म्हणजे २५ हजार अब्ज रूपयांचा फटका बसत असल्याचे इकॉनॉमिक कार्पोरेशन अॅन्ड डेव्हलपमेंटच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या व्यवसायामुळे सर्वाधिक नुकसान नाईकी ब्रँडला सोसावे लागले असल्याचेही निष्पन्न झाले आहे. अन्य कंपन्यात रोलेक्स, रेबॅन अशा महत्त्वाच्या कंपन्यांचा समावेश आहे.

या अहवालात असे नमूद केले गेले आहे की फूटवेअर, कपडे, बॅग्ज पासून ऑटो पार्ट ते लहान मुलांची खेळणी अशा सर्व वस्तूंचा बनावट माल बाजारात उपलब्ध असतो. वस्तू व्यवसायाच्या जगभरातील एकूण व्यवसायात अशा नकली वस्तू व्यवसायाचा हिस्सा अडीच टक्के आहे. या बनावट वस्तू व्यवसायामुळे जगात ज्या देशांचे सर्वाधिक नुकसान होते त्यात अमेरिकेचा नंबर पहिला आहे. अमेरिकेला या मुळे एकूण व्यवसायाच्या २० टक्के नुकसान सोसावे लागते तर इटलीत हे प्रमाण १५ ट्क्के, फ्रान्समध्ये १२ ट्क्के आहे. या यादीत चीन १० व्या नंबरवर आहे.

याविषयी माहिती देताना नाईकी ब्रँडचे प्रमुख म्हणाले, आम्ही आमच्या ब्रँड प्रोटेक्शनची खूप काळजी घेतो. त्यासाठी कायदा विभाग, कस्टम विभागाचे सहाय्य घेतले जाते. तरीही बनावट मालावर पूर्ण नियंत्रण आणणे शक्य होत नाही.

Leave a Comment