जगातील सर्वात लहान अँड्रॉईड फोन लाँच

android
मुंबई – सध्या प्रत्येकाच्याच हातात मोठ-मोठे स्मार्टफोन्स आपल्याला पहायला मिळतात. हे मोठे फोन हँण्डल करण्यास अनेक अडचणी येतात. मात्र, आता ही अडचण आता दूर होणार आहे. कारण पॉश मोबाईल कंपनीने आपला सर्वात लहान स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल केला आहे.

पॉश मोबाईल कंपनीने आपला मायक्रो एक्स एस२४० हा जगातील सर्वात लहान स्मार्टफोन बाजारपेठेत आणला आहे. या स्मार्टफोनची स्क्रिन फक्त २.४ इंच इतकीच आहे. हा फोन दिसायला जितका लहान आहे तेवढेच जबरदस्त या फोनचे फिचर्स आहेत. या फोनमध्ये इतर फोन्सप्रमाणे तुम्ही फोटो गॅलरी, म्युझिक, वेब ब्राउझरचा वापर करु शकतात.

मायक्रो एक्स एस२४० या स्मार्टफोनमध्ये ४जीबीची इंटरनल मेमरी देण्यात आलेली आहे. ५१२एमबी रॅमही देण्यात आलेली आहे. मोबाईलचा की पॅड अत्यंत लहान असल्याने टाईप करताना यूजर्सला अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यात २.४इंचाचा डिस्प्ले, २ मेगापिक्सल आणि व्हीजीए कॅमेरा देण्यात आला आहे.

Leave a Comment