उद्योगक्षेत्रातील मजूर व कामगारवर्गासाठी ब्रिटनमधील कंपनी डीवॉल्टने एक खास स्मार्टफोन बनविला आहे. हा फोन इतका टफ आहे की दोन मीटर उंचीवरून म्हणजे साधारण ६ फुटांवरून जरी तो विटा, दगड, काँक्रिट वा फरशीसारख्या कडक पृष्ठभागावर आदळला तरी तो फुटणार नाही अथवा खराबही होणार नाही. या फोनचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे तो ० ते उणे वीस तसेच उन्हाळ्यात ६० डीग्री तापमानातही उत्तम काम करेल. डिवॉल्टने या फोनचे नामकरण एमपी ५०१ असे केले असून तो त्यांचा स्मार्टफोनमधला पहिलाच प्रयोग आहे.
खास कामगारांसाठी डिवॉल्ट एमपी ५०१ टफ स्मार्टफोन
हा अँड्राईड स्मार्टफोन वॉटरप्रूफ तसेच डस्टप्रूफ आहे. त्याला गोरिल्ला ग्लास थ्री प्रोटेक्शनही दिले गेले आहे. टफफोनचे प्रमुख जेम्स बुकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या फोनची बॉडी टफ असल्याने त्याला मोठी बॅटरी लावता येते. हा फोन ८ तासांचा टॉकटाईम देईल. त्याला इनबिल्ट वायरलेस चार्जर दिला गेला आहे. हातमोजे घालूनही त्याचा टच स्क्रीन वापरता येणार आहे. या फोनची किंमत ५४४ डॉलर्स म्हणजे साधारण ३८हजार रूपये आहे.