सर्वात मोठी फर्निचर विक्रेती बनणार फ्लिपकार्ट

flipkart
नवी दिल्ली – चालू वर्षाच्या अखेरपर्यंत फ्लिपकार्ट भारतातील सर्वात मोठी फर्निचर विक्रेती होण्याच्या तयारीत असून ई-कॉमर्स विक्रेत्यांनी १५ पट वाढ मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. नऊ वर्षे जुनी कंपनी असलेल्या या कंपनीने आपली वाढ होण्यासाठी मुख्य स्वरुपात इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल तसेच इतर अनेक विभागामध्ये आपले लक्ष्य केंद्रित केले आहे.

कंपनी नफा मिळविण्यासाठी प्रयत्न करत असून, बेंगळूरस्थित या ई-कॉमर्स कंपनीने चालू वर्षामध्ये गृह फर्नशिंग आणि ऑटोमोबाईल सारख्या नवीन उत्पादन विभागामध्ये प्रवेश केल्यामुळे व्यवहारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कंपनीला मोठय़ा प्रमाणावर नफा होत आहे.

Leave a Comment