‘व्हॉटसअप ग्रुप’ बनवण्यासाठी घ्यावे लागणार लायसन्स!

whatspapp
नवी दिल्ली : यापुढे जम्मू-काश्मीरमध्ये ‘व्हॉटस अप न्यूज ग्रुप’साठी लायसन्स घेणे बंधनकारक असणार आहे. प्रशासनाकडून हे पाऊल वेगाने फैलावत जाणाऱ्या अफवा रोखण्यासाठी उचलण्यात आले आहे. याबद्दल १८ एप्रिल रोजी एक आदेश जारी केला आहे.

व्हॉटसअप सोशल नेटवर्किंग साईट असल्याने त्यावर कुणीही आपला ग्रुप तयार करू शकते. काश्मीरमधील अनेक भागांत पत्रकारांनी अनेक असे न्यूज ग्रुप बनलेले आहेत. अनेकदा यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश असतो.

याबाबत मिळालेल्या आदेशानुसार, या ग्रुपवर अतिरिक्त सूचना अधिकारी नजर ठेवतील आणि जिल्हा अधिकाऱ्यांना सूचना देतील. ग्रुपमध्ये शेअर करण्यात आलेल्या कोणत्याही पोस्ट किंवा कमेंटसाठी अॅडमिनिस्ट्रेटरला जबाबदार धरण्यात येईल. या आदेशात सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या कोणत्याही धोरणाबद्दल टिप्पणी न करण्याबद्दल ताकीद देण्यात आली आहे. हंदवाडाच्या घटनेनंतर काश्मीर पोलीस या व्हॉटसअप ग्रुपमुळे चिंतेत आहेत. काही व्हॉटसग्रुपवर या घटनेनंतर जाणून बुजून अफवा पसरवल्या जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment