मोटो एक्स फोर्सवर १६ हजार रुपयांची सूट

moto-x-force
मुंबई : मोटोरोला कंपनीचा सर्वात शानदान स्मार्टफोन मोटो एक्स फोर्सवर घसघशीत सूट देण्यात येत आहे. ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर ही सूट १६ हजार रुपयांपर्यंत देण्यात आली आहे.

हा स्मार्टफोन ५.४ इंच असून क्वाड एचडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये २१ मेगापिक्सल रिअर आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. मोटो फोर्समध्ये मायक्रो एसडी कार्डचा उपयोग करु शकता. मेमरी २ टीबीपर्यंत वाढवू शकता. या स्मार्टफोनमध्ये ३२ जीबी आणि ६४ जीबी वॅरिएंटवर १६ हजार रुपयांची सूट मिळत आहे. हा फोन फेब्रुवारी महिन्यात लॉन्च झाला होता. ३२ जीबी वॅरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये तर ६४ जीबीची ५३,९९९ रुपये किंमत होती. अनुक्रमे १५ हजार आणि १६ हजारांची सूट देण्यात येत आहे. तसेच मोटो जी (जेन ३) वर १००० रुपयांची सूट देण्यात येत आहे. हा फोन आता ९९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे.

Leave a Comment