‘मॉंडेलेझ’चे ‘बोर्नव्हिटा कुकीज’ लवकरच बाजारात

bournvita-cookies
मुंबई: कॅडबरी चॉकलेटच्या उत्पादनातील एक अग्रणी नाव असलेल्या ‘मॉंडेलेझ इंडिया’ने ‘बोर्नव्हिटा कुकीज’ हे बिस्कीटच्या स्वरूपातील आपले दुसरे उत्पादन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करून दिले आहे. या पूर्वी ‘ऑरियो’ बिस्कीटाला सन २०११ पासून खाद्यप्रेमींकडून पसंती मिळाली आहे.

सकाळच्या नाश्त्यामध्ये महत्वाचे स्थान निर्माण करू शकणाऱ्या या बिस्किटामध्ये ‘बोर्नव्हिटा या लोकप्रिय पेयाची चव, अन्य व्हिटॅमिन्स आणि पोषक घटकांचा समावेश असल्याचा उत्पादकांचा दावा आहे.
भारतीय खाद्यप्रेमींच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये दुधाचा समावेश असलेली पेय आणि बिस्कीट हे अनिवार्य पदर्थ आहेत. ज्यावेळी ‘बोर्नव्हिटा’ बाजारात आणण्यात आला; तेव्हा पेयांच्या चवीचा एक नवा अनुभव खाद्यप्रेमींना मिळवून देणे हे उद्दिष्ट होते. आता बिस्किटच्या अनोख्या चवीची अनुभूती देणे हे ‘बोर्नव्हिटा कुकीज’चे उद्दिष्ट आहे; असे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक चंद्रमौळी वेंकटेशन यांनी सांगितले.

बिस्कीट, पेय, चॉकलेट, गम्स, कँडी या खाद्यपदार्थांच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या कंपनीने बिस्किट्सचा ग्राहक असलेल्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी ग्राहकांच्या आवडीनिवडीचा व्यापक अभ्यास केला आहे.

मे महिन्यापर्यंत भारतातील सर्व शहरी आणि ग्रामीण बाजारपेठेत वितरकांच्या व्यापक जाळ्यामार्फत ‘बोर्नव्हिटा कुकीज’ सर्वत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही बिस्किटे १० रुपये आणि २५ रुपये अशा दोन प्रकारच्या पँकिंग्जमध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यापूर्वी ‘स्नॅपडील’मार्फतही ‘बोर्नव्हिटा कुकीज’ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Leave a Comment