मॅगीच्या आटा व ओट नूडल्स बाजारात येणार

nuddles
इन्स्टंट नूडल्स बाजारातील आपला हिस्सा परत मिळविण्यासाठी नेस्ले मॅगीने त्यांच्या आटा व ओट नूडल्स पुन्हा भारतीय बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. चार महिन्यांच्या बंदी प्रकरणानंतर मॅगीने त्यांच्या मसाला व चिकन नूडल्स यापूर्वीच बाजारात आणल्या आहेत. मात्र आटा व ओट नूडल्स खुल्या बाजारात आणण्यापूर्वी २२ एप्रिलपासून त्या स्नॅपडीलवर खरेदी करता येणार आहेत. ग्राहकांना या विशेष पॅकसाठी १७६ रूपये मोजावे लागणार आहेत. या पॅकमध्ये चार आटा पॅकबरोबरच दोन ओटस नूडल्सचे पॅक शिवाय दोन रंगीत बाऊल्सही दिले जाणार आहेत.

नेस्लेचे भारतातील प्रमुख सुरेश नारायण म्हणाले, आमच्या ग्राहकांना सर्व पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे.त्या दृष्टीनेच ओटस व आटा नूड्ल्सही पुन्हा बाजारात आणल्या जात आहेत. खुल्या बाजारात या नूडल्सच्या ८० ग्रॅमच्या पॅकसाठी २० रूपये किंमत ठरविली गेली आहे.

Leave a Comment