बीएसएनएल देणार केवळ ५० रुपयांमध्ये २० जीबी थ्रीजी इंटरनेट

bsnl
नवी दिल्ली- आता आपल्या ग्राहकांसाठी एक नवी योजना बीएसएनएलने आणली असून या योजनेमुळे ग्राहकांना केवळ ५० रुपयांमध्ये २० जीबी थ्रीजी इंटरनेट वापरता येणार आहे. एका इंटरनेट कनेक्शनच्या आधारे चार-पाच जणांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपली संपुर्ण माहिती ‘बीएसएनएल मोबाइल सेफ केयर पोर्टल’वर द्यावी लागणार आहे. यात वापरकर्त्यांला अन्य चार मोबाईल क्रमांकाची माहिती मागितली जाणार आहे. हे वापरकर्ते एकमेकांशी संपर्कात राहण्यास इच्छूक असावेत. त्यानंतर या सर्वांना वेगवान थ्रीजी इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याचे शुल्क मात्र मुख्य वापरकर्त्याला भरावे लागणार आहे. बीएसएनएलचे मुख्य महाप्रबंधक रामशब्द यादव यांनी सांगितले की सर्वच लोकांकडे इंटरनेटची सुविधा असावी अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे ही योजना लवकरात लागु करणार आहे. साधारणत: एक जीबी इंटरनेटसाठी ग्राहकांना २०० रुपये मोजावे लागत आहेत.

1 thought on “बीएसएनएल देणार केवळ ५० रुपयांमध्ये २० जीबी थ्रीजी इंटरनेट”

  1. बातमी चांगली आहे.पण पहिलं नेटवर्क मध्ये सुधारणा करा.शहरा मध्ये तुमचे नेटवर्क मिळत नाही तर ग्रामीण भागात काय आवस्था आसेल.पहिलं नेटवर्क चांगले द्या मग प्लॅन चांगले आणा

Leave a Comment