‘इंटेल’च्या हजारो कर्मचाऱ्यांवर बेकारीची टांगती तलवार

Intel
न्यूयॉर्क: सातत्याने नफ्याचे प्रमाण घटत असल्याने ‘इंटेल’ कंपनीने मोठ्या प्रमाणात कामगार कपात करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर बेकारीची टांगती तलवार उभी राहिली आहे.

‘इंटेल’ या कंपनीच्या एकूण व्यवसायातील तब्बल ६० टक्के व्यवसाय ‘पर्सनल कॉम्प्युटर’च्या विक्रीमधून येत आहे. मात्र इंटरनेट आणि संगणकातील बहुतेक सर्व सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या स्मार्ट फोन्सचा जगभर वाढता प्रसार होत असल्याने संगणकाच्या विक्रीवर विपरीत परिणाम होऊन त्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर घटत आहे. याचा मोठा फटका ‘इंटेल’ला बसतो आहे.

या पार्श्वभूमीवर जगभरात कार्यरत असलेल्या १ लाख ७ हजार कर्मचाऱ्यांपैकी ‘इंटेल’ने सन २०१५ मध्ये १ हजार १०० कर्मचाऱ्यांना कमी केले होते. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा वित्तीय अहवाल सादर झाल्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता असून त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांवर बेकार होण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment