देशातील एकमेव ग्वाल्हेरचे जैन सुवर्णमंदिर

ahavir
ग्वाल्हेर- आजच्या महावीरजयंतीच्या निमित्ताने देशातील एकमेव जैन सुवर्णमंदिर म्हणून ओळखल्या जाणार्‍या ग्वाल्हेरच्या जैन मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील हे मंदिर ३१० वर्षे जुने असून त्यात १ इंचापासून ते सहा इंचापर्यंतच्या विविध आकारातील १९३ मूर्ती असल्याचे सांगितले जाते.

कलाकुसरीने परिपूर्ण अशा या मंदिरात ८० किलो सोन्याचा वापर केला गेला आहे. असेही सांगतात की हे मंदिर बांधायला १० वर्षे लागली मात्र भितींवरील कलाकुसरीचे काम पूर्ण करायला ४५ वर्षे लागली. यात सोने पॉलिश केलेल्या मूर्तींची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर कलाकुसरीतील रंगांसाठी मौल्यवान रत्नांचा वापर केला गेला आहे. मंदिराच्या भिंतीवर अतिशय सुंदर पेटींग्ज आहेत. ग्वाल्हेरच्या डडवाडा ओलीमध्ये हे मंदिर आहे.

मंदिरातील विविध आकाराच्या १९३ मूर्ती बनविताना चांदी, पोवळे, स्फटीक, मणि, स्लेट, पाषाण, कसोटीचा दगड, संगमरवर, काळा पांढरा पाषाण यांचा वापर केला गेला आहे. जैन समाजात या मंदिराची यात्रा करणे महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते.

Leave a Comment