इंटरनेट कनेक्शनशिवाय मोबाईल इंटरनेट योजना

mobile
इंटरनेट कनेक्शनशिवायच मोबाईलवर इंटरनेट वापरण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जात असून ही सेवा बीएसएनएल कडून पुरविली जाणार आहे. डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत प्रत्येक हातात इंटरनेट हे ध्येय ठेवले गेले आहे. व ही योजना त्याचाच एक भाग आहे.

या योजनेनुसार बीएसएनएलच्या एका ग्राहकाला इंटरनेट कनेक्शन घेता येईल व त्याच्या परिचयातील अथवा नातेवाईकांतील चार जणांना त्यांच्या मोबाईलवरून इंटरनेट कनेक्शन न घेताही इंटरनेट वापरता येईल.देशातील बीएसएनएलच्या कुठल्याही ग्राहकांना ही सुविधा मिळेल. त्यासाठी बीएसएनएल सेफ केअर पोर्टलवर जाऊन तेथे असलेल्या सूचना फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर चार मोबाईल नंबर व मूळ मोबाईल धारक अशा पाच जणांना एकाचवेळी थ्रीजी च्या वेगाने इंटरनेट सुविधा वापरता येईल. यात बिल मुख्य ग्राहकाच्या नावानाचे येणार आहे.

अर्थात यासाठीही वेगवेगळे प्लॅन असतील. सर्वसाधारणपणे एक ग्राहक १ जीबी डेटा वापरतो व त्यासाठी २०० रूपये भरावे लागतात येथे पाच जीबीसाठी ५०० रूपयेच भरावे लागतील. तसेच महिला ५० रू. भरूनही ही सेवा घेता येईल मात्र त्यासाठी २० जीबीचा प्लॅन घ्यावा लागेल. सध्या देशात मोबाईल इंटरनेट धारकांची संख्या ४० टक्के आहे ती शंभर टक्के व्हावी असा सरकारचा प्रयत्न आहे.

Leave a Comment