अॅपल जर्मनीत गुपचुप बनवत आहे आपली कार

apple-car
नवी दिल्ली – गॅझेटप्रेमींना नेहमीच नवनवीन गॅझेट देऊन आपल्याकडे आकर्षित करणाऱ्या अॅपल आता आपल्या एका नव्या गॅझेटमध्ये व्यस्त आहे. पण हे गॅझेट नसून एक कार आहे. याबाबत अशी चर्चा सुरु आहे की, अॅपल जर्मनीच्या आपल्या एका लॅबमध्ये यावर काम सुरु आहे. यापूर्वी अशी देखील बातमी आली होती की, कंपनी या सिक्रेट प्रोजेक्टवर कॅलिफोर्नियातच काम करत आहे. पण यावेळी एका जर्मन वेबसाईटने अॅपलच्या बर्लिन येथील लॅबमध्ये या सिक्रेट कारवर १५-२० कर्मचारी करत आहेत. यासर्व कर्मचा-यांना जर्मनीच्या एका ऑटो कंपनीतून हायर करण्यात आले आहे. अॅपलची ही कार इलेक्ट्रिक असल्याची चर्चा देखील होत आहे.

Leave a Comment