स्पाय बेड ठेवेल पार्टनरवर नजर

bed
स्पेनच्या एका कंपनीने स्मार्ट बेड बाजारात आणला आहे. हा बेड आपला जोडीदार आपल्याशी प्रतारणा करून दुसर्‍यांबरोबर कांही लफडी तर करत नाही ना याची सूचना मालकाला देतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार या बेडमध्ये लव्हर डिटेक्शन सिस्टीम बसविली गेली आहे त्यामुळे हा बेड आपल्या मालकाला ओळखतो व अन्य कुणी व्यक्ती बेडवर आली तर त्याची सूचना त्वरीत मालकाला देतो.

कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे हे तंत्रज्ञान बाजारात धूम माजवेल. यामुळे आपल्या लाईफ पार्टनरला धोका देणे अशक्य होईल अर्थात त्यासाठी घरात व त्यातही बेडवर असणे आवश्यक आहे. कुणीही परका पुरूष अथवा महिला या बेडवर आली तर त्याचा मेसेच मूळ मालकाला हा बेड देईलच पण बेडवर काय हालचाली सुरू आहेत त्याचे रेकॉर्डींगही हा बेड करेल. हा बेड दिसायला नॉर्मल बेड प्रमाणेच आहे. त्यामुळे पार्टनरपैकी ज्याला आपला जोडीदार आपल्याशी प्रतारणा करतो आहे असा संशय असेल त्याने हा बेड आणला तर हा संशय खरा की खोटा हे समजू शकेल असे कंपनीचे म्हणणे आहे.

Leave a Comment