
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचा-यांच्या तब्बल २.२ लाख रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली असून आगामी २ वर्षांत ही नोकरभरती करण्याचे नरेंद्र मोदी सरकारने ठरवले आहे. २०१६-१७ च्या अर्थसंकल्पानूसार १ मार्च २०१५ पर्यंत केंद्रसरकारी कर्मचा-यांची संख्या ३३.०५ लाख होती, जी २०१६ला वाढून ३४.९३लाख झाली आहे. नवीन नोकरभरतीमुळे १ मार्च २०१७पर्यंत केंद्रिय कर्मचा-यांची संख्या ३५.२३ लाख होणार आहे. यात रेल्वे विभागाचाही समावेश आहे. सध्या रेल्वेत १३ लाख २६ हजार ४३७ कर्मचारी आहेत.
२.२ लाख कर्मचा-यांची भरती करणार मोदी सरकार
प्रस्तावित नोकरभरती योजनेनूसार महसूल विभागात ७० हजार कर्मचाऱयांची भरती केली जाणार आहे. यानंतर सर्वाधिक नोकरभरती ४७ हजार इतकी निमलष्करी दलात होणार आहे. याव्यतिरिक्त गृहमंत्रालयातील कामांसाठीही ६ हजार कर्मचा-यांची भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिका-याच्या माहितीनूसार केंद्र सरकारच्या कित्येक विभागात गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱयांची भरती झालेली नाही. सर्व विभागांत सध्या जवळपास ६ लाख पदे रिक्त आहेत.
