यंदा १०० वर्षात प्रथम अक्षय्यतृतीयेला विवाहमुहूर्त नाही

marriage
यंदा १०० वर्षांनंतर प्रथमच अक्षय्यतृतीयेला लग्नाचे सनईचौघडे वाजू शकणार नाहीत कारण या दिवशी लग्नाचा मुहूर्तच नाही. लग्नासाठी चंद्रबळ, गुरूबळ व शुक्रबळ असावे लागते. यंदा या दोन्ही ग्रहांचा अस्त होत असल्याने विवाहमुहूर्तच नाहीत असे ज्योतिषांचे म्हणणे आहे. परिणामी लग्नमांडवात सनई चौघडे वाजणार नाहीत.

अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तातला एक व म्हणून अतिशय उत्तम मुहूर्त मानला जातो. यंदा २ मे रोजी अक्षय्य तृतीया येते आहे. या दिवशी केलेल्या कोणत्याही कामाचे अक्षय म्हणजे आयुष्यभर फळ मिळते असा समज आहे. त्यामुळे या मुहूर्तावर अनेकजण लग्नबंधनात अडकतात.या दिवशी ज्यांचा विवाह होतो त्यांच्यावर ईश्वराची विशेष कृपा राहते व त्यांचा संसार सुखाचा व यशस्वी होतो अशी भावना आहे. यंदा ३० एप्रिल रोजीच गुरू व शुक्र ग्रहाचा अस्त होत आहे त्यामुळे शेवटचा लग्नमुहूर्त २९ एप्रिल रोजी आहे असे पंचांगकर्त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment