त्वचेच्या आरोग्यासाठी फळांचे सेवन

fruite
वय वाढत चालले की शरीर थकते. चेहर्‍यावर सुरकुत्या पडायला लागतात आणि त्वचेवरची झळाळी कमी व्हायला लागते. आपल्याला वृध्दत्त्वाची अशी जाणीव अस्वस्थ करते अन् मग आपण विविध प्रकारची औषधे वापरून त्वचा तुकतुकीत करण्याचा प्रयत्न करायला लागतो. मात्र ही गोष्ट निसर्गाच्या सहाय्याने केली तर ती अधिक फायदेशीर ठरू शकते. म्हणून वृध्दत्वाच्या या खुणा टाळण्यासाठी ५ प्रकारच्या फळांचे सेवन अधूनमधून करावे.

संत्रे :- संत्रा हे फळ क जीवनसत्त्वाने परिपूर्ण असते. किंबहुना क जीवनसत्त्वाचा विपुल पुरवठा करायची ताकद संत्र्यात असते. संत्र्याचे फळ खावून तर चेहरा तुकतुकीत होऊ शकतोच परंतु संत्र्याचा रस चेहर्‍यावर चोळल्यानेसुध्दा हाच गुण मिळू शकतो. त्याशिवाय संत्र्याची सालसुध्दा तिची पावडर करून वापर करता येते. सफरचंद ः- चेहर्‍याच्या त्वचेवर सर्वाधिक चांगला परिणाम करणारा फळ म्हणजे सफरचंद. त्यासाठी आवश्यक असलेले पोटॅशियम हे पोषण द्रव्य सफरचंदात विपुल असते.

पपई ः- पपईला देवदुताचे फळ असे म्हणतात. ते पोषणद्रव्याने परिपूर्ण असतेच पण काही दुर्मिळ एन्झाईन्स पपईमध्ये असतात. रोज थोडी पपई खाल्ल्याने वजन घटते आणि चेहरा तरुण असल्याचा दिसतो. पपईचे काळे बी चेहर्‍याला चमक आणणारे असते. टरबूज ः- टरबुजामुळे लायकोपीन, जीवनसत्त्व क आणि अ ही द्रव्ये मिळतात आणि त्वचेचा ओलावा टिकवला जातो. त्वचेवरची अनावश्यक रंध्रे टरबुजामुळे बुजवली जातात. टरबुजाची साल चेहर्‍यावर घासली तर चेहरा स्वच्छ होतो.

डाळींब ः- चेहर्‍याच्या तारुण्यासाठी आवश्यक असलेली प्युनिसिक ऍसिड आणि इलॅजिक ऍसिड ही दोन दुर्मिळ द्रव्ये डाळिंबामध्ये असतात. या द्रव्यांसाठी डाळींब हा सर्वात मोठा स्रोत आहे. डाळिंबामध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड असते. जे त्वचेच्या नव्या पेशी निर्माण करते आणि रक्तातील लाल पेशींचे प्रमाण वाढवते. रक्त प्रवाह वेगवान करते. अ, क आणि ई ही तीन जीवनसत्त्वे डाळिंबात विपुल प्रमाणात असतात. त्याशिवाय डाळिंबात इतरही पोषणद्रव्ये असतात. कोरड्या त्वचेला ओलावा देण्याचा गुणधर्म डाळिंबात असतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment