३० लाखाची इंडियन स्प्रिंगफील्ड भारतात लॉन्च

indiana
भारतात इंडियन मोटरसायकलने नवी बाईक इंडियन स्प्रिंगफील्ड लॉन्च केली आहे. या शानदार बाईकची किंमत ३०.६ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी ठेवण्यात आली आहे. या बाईकची स्टायलिंग क्लासिक आणि यात मॉडर्न टेक्नोलॉजीचा देखील वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर यात टूअरिंग कंफर्टचे खासकरून लक्ष ठेवण्यात आले आहे. या बाईकची बुकिंग सुरु झाली असून त्याची डिलीव्हरी ऑगस्ट महिन्यात सुरु करण्यात येईल.

यावेळी पोलेरिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक पंकज दूबे यांनी सांगितले की, इंडियन बाईकमध्ये टुअरिंग कंफर्ट आणि क्लासिक स्टायलिंगचा ताळमेळ आहे. त्याचबरोबर या बाईकमध्ये कंफर्टचे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

इंडियन स्प्रिंगफील्डमध्ये थंडरस्ट्रोक १११ इंजिन देण्यात आले आहे, जे १३८.९ Nm चे टॉर्क देते. या बाईकमध्ये नवे डिझाईन केले गेलेले चेसिसवर तयार करण्यात आले आहे, जो जास्त वजन पेलू शकतो. त्याचबरोबर बाइकमध्ये एडजस्टेबल रियर शॉक लावण्यात आला आहे, जो २४१.७ किलो वजन उचलू शकतो. बाईक कंफर्टसाठी क्विक रिलीज विंडशिल्ड, रिमोट लॉकिंग हार्ड बॅग आणि एडजस्टेबल पॅसेंजर फ्लोरबोर्ड लावण्यात आला आहे. सेफ्टी फीचर्ससाठी बाईकमध्ये हाई-रिझोल्यूशन एंटी-लॉक ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग, इलेक्ट्रॉनिक क्रूज़ कंट्रोल, पावरफुल हेडलाईट आणि डुअल ड्रायविंग लाईटसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Leave a Comment