फ्रेंच कारमेकर सिट्राॅनने दीर्घकाळानंतर त्यांची एसयूव्ही कॅक्टस सादर केली असून जाणकारांच्या मते ही भविष्यातील एसयूव्ही ठरेल. या एसयूव्हीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू होण्यास अद्याप थोडा कालावधी असला तरी या नव्या हायब्रिड एअर ड्राईव्हड्रेनबद्दल आत्तापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.
सिट्राॅनची कन्सेप्ट एसयूव्ही- कॅक्टस
पेट्रोल इंजिन असलेल्या या गाडीला कॉम्प्रेस्ड एअर व हॅड्राॅलिक एकत्र करून पॉवर मिळते. या एसयूव्हीचा साईड व रियर व्ह्यूही अतिशय आकर्षक बनविला गेला असून टेल लँप अतिशय आटोपशीर आहेत. डॅशबोर्डवर सर्व फंक्शन्स स्वच्छ दिसतात आणि ही एसयूव्ही इंधन बचत करणारी व त्यामुळे मालकाला किफायतशीर ठरेल असा कंपनीचा दावा आहे. कारला देण्यात आलेल्या लामा ग्रे एअरबॅग्ज मुळे स्क्रॅच प्रोटेक्शन मिळते तसेच या कारचे डिझाईनच असे केले आहे की ज्यामुळे गाडीत प्रकाश भरपूर येईल पण बाहेरची उष्णता मात्र आत येऊ शकणार नाही.
कारच्या किंमती तसेच ती बाजारात नक्की कधी येणार यासंदर्भातली माहिती मिळू शकलेली नाही.