वनप्लस स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काऊंट

oneplus
मुंबई: १६ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट चीनची स्मार्टफोन कंपनी वनप्लस देत असून वनप्लस वन, वनप्लस २ आणि वनप्लस x या फोनवर हा डिस्काऊंट मिळणार आहे, तसेच यासाठी तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन द्यावा लागणार आहे. ग्राहकांना या डिस्काऊंटचा लाभ अॅमेझॉन आणि रिब्लोबवर घेता येणार आहे.

वनप्लसचा हा स्मार्टफोन जेव्हा तुमच्या घरी येईल तेव्हा तुम्हाला जुना फोन परत द्यावा लागेल, आणि तेव्हाच कॅशबॅकही मिळणार आहे.

वन प्लस Xमध्ये ५ इंचाचा डिस्प्ले, ३ जीबी रॅम आणि २.३ GHZ स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे. तसेच १६ जीबीची इंटरनल मेमरी असून १२८ जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने मेमरी वाढवता येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रिअर आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. ५.१.१ लॉलीपॉपवर हा फोन चालेल.

वनप्लस २ या स्मार्टफोनचा डिस्प्ले ५.५ इंचाचा आहे. या फोनची रॅम ४ जीबीची आहे. तर रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. या फोनच्या कॅमेरातून काढलेले फोटो क्वालिटी ५० मेगापिक्सल्या कॅमेराइतकी असेल असा दावा कंपनीने केला आहे. या फोनमध्ये इनबिल्ड असलेल्या कॅमेरा ऍपमुळे फोटो आणखी चांगले दिसतात, असे कंपनीचे म्हणणे आहे.

Leave a Comment