सिगारेटचे उत्पादन पुन्हा सुरू

cigarate
नवी दिल्ली – आरोग्याबाबतच्या इशाऱ्याचा आकार सिगारेटच्या पाकिटावर वाढविण्याच्या सरकारच्या आदेशांमुळे बंद करण्यात आलेल्या सिगारेटचे उत्पादन ‘आयटीसी‘ ही कंपनी लवकरच सुरु करणार आहे.

सरकारने तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनांच्या पाकिटावर ८५ टक्के भागात आरोग्याबाबतचा वैधानिक इशारा छापण्याचा आदेश दिले आहेत. यापूर्वी पाकिटावरील केवळ २० टक्के जागेतच असा इशारा छापण्याचे बंधन होते. मात्र नवे धोरण अस्पष्ट असल्याचा दावा करत सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करून बहुतेक कंपन्यांनी सिगारेटचे उत्पादन थांबविले होते. या प्रकरणी आयटीसी या कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. कंपनीच्या बाजूने उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यामुळे लवकरच सिगारेटचे उत्पादन सुरू करण्यात येईल, अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र त्याबाबत सविस्तर तपशील देण्यास नकार दिला आहे. सिगारेटचे विविध ब्रॅण्ड बनविणाऱ्या आयटीसीचे देशातील विविध ठिकाणी प्रकल्प आहेत.

Leave a Comment