भारतीय इंजिनिअर विद्यार्थ्याकडून झुकरबर्गने खरेदी केले डोमेन

mark
कोची – ‘फेसबुक’चा संस्थापक मार्क झुकरबर्गने एका भारतीय इंजिनियर विद्यार्थ्याकडून एक डोमेन खरेदी केले आहे. यासाठी झुकरबर्गने मोठी किंमतही मोजल्याची माहिती मिळाली असून या विद्यार्थ्याचे अमल अगस्टाइन असे नाव आहे. डोमेन खरेदी करण्यासाठी फेसबुक सारख्या मोठ्या कंपनीने आपला शोध घेतल्याचे अप्रुप वाटत असल्याचे अमलने म्हटले आहे. फेसबुकने ४६ हजार रुपयांमध्ये अमलकडून डोमेन खरेदी केले.

कोची येथे अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात अमल ऑगस्टाईन हा शिकत असून त्याचा डोमेन नेम विकत घेणे आणि विकणे हा छंद आहे. अशाच प्रकारे त्याने मार्क झुकेरबर्गला मागील डिसेंबरमध्ये कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर मॅक्‍सिमा चॅन झुकेरबर्ग नावाने डोमेन नेम विकत घेतले होते. दरम्यान हे डोमेन नेम खरेदी करण्याची इच्छा दर्शविणारी मेल त्याला प्राप्त झाली. याबाबत बोलताना अमल म्हणाला, मी असे डोमेन नेहमी खरेदी करतो. मागील डिसेंबरमध्ये झुकेरबर्गला कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर मी तिच्या नावे डोमेन नेम खरेदी केले होते. मात्र ते खरेदी करण्यासाठी प्रत्यक्ष फेसबुकने इच्छा दर्शविल्याने मला आनंद झाला. त्यानंतर फेसबुकच्या आयकॉनिक कॅपिटलच्या व्यवस्थापक सारा चापेल यांच्याशी झालेल्या आर्थिक करारानंतर अमलने ७०० डॉलर्समध्ये हा व्यवहार पूर्ण केला.

Leave a Comment