अॅपलची युज्ड फोन्समधून ४ कोटी डॉलर्सची सोने कमाई

apple
अॅपलने भंगारात टाकल्या गेलेल्या किंवा वापरात नसलेल्या आयफोन व संगणकाच्या रिसायकलिंग मधून ४ कोटी डॉलर्स म्हणजे तब्बल २६४ कोटी रूपयांचे सोने काढले असल्याचे समजते. या प्रकारे रिसायकलींगच्या व्यवसायात अॅपलने मोठे यश प्राप्त केले आहे. कंपनीने नुकत्याच जारी केलेल्या वार्षिक पर्यावरण अहवालात ही माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एका स्मार्टफोनमध्ये साधारण पणे ३० मिलिग्रॅम सोने असते. इलेक्ट्राॅनिक कचर्‍यातून अॅपलने ६ कोटी पौंडापेक्षा अधिक स्टील, अॅल्युमिनियम, ग्लास व अन्य मटेरियलही मिळविले आहे. स्मार्टफोनमध्ये सर्कीट बोर्ड व इंटरनल कंपोनंटमध्ये सोन्याचा वापर केला जातो. अॅपलने असे लाखो आयफोन व संगणक रिसायकल केले आहेत. त्यांच्या वॉच एडिशनमध्येही १८ कॅरेटचे ५० मिलीग्रॅम सोने वापरले जाते तेही सोने अॅपलने जमा केले असावे असाही अंदाज वर्तविला जात आहे.

Leave a Comment