सॅमसंगच्या स्मार्टफोनवर जबरदस्त सूट

samsung
मुंबई: सॅमसंग वीक सेल ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर सुरु झाला असून या सेल दरम्यान सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोन आणि डिव्हाइसवर खास ऑफर आणि डिस्काउंट देण्यात येत आहेत. सॅमसंग वीक १५ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत फ्लिपकार्टवर सुरु असणार आहे.

या सेलमध्ये गॅलक्सी कोअर प्राइम, गॅलक्सी नोट ४, गॅलक्सी एस७ आणि गॅलक्सी एस५ आणि नुकताच लाँच झालेला एस७ एज यासारख्या अनेक स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळत आहे. या सेलमध्ये गॅलक्सी कोअर प्राइम रु. ५९९० उपलब्ध असून नोट ४वर तब्बल ७००० रुपयांची सूट देण्यात आली आहे. तर एस५ वर ६०००रु. डिस्काउंट देण्यात आला आहे. याशिवाय गॅलक्सी ऑन ५ हा ७९९० रु. आणि गॅलक्सी ऑन ७ हा ८९९० रुपयात उपलब्ध आहे. तर सॅमसंगने नुकताच लाँच केलेला एस७ एज या स्मार्टफोनवर ५० टक्के सूट देण्यात आली आहे.

Leave a Comment