‘वायफाय’मय झाले पुणे रेल्वे स्टेशन

wifi
पुणे – इंटरनेट सेवा पुरविणार्‍या आणि भारतीय रेल्वेचा भाग असलेल्या ‘रेलटेल’ने गुगलच्या सहकार्याने आपल्या विस्तृत नेटवर्कच्या आधारे पुणे रेल्वे स्टेशनवर मोफत हायस्पीड पब्लिक वायफाय इंटरनेट सेवा उपलब्ध करण्याची घोषणा केली असून या सुविधेचा लाभ स्टेशनला भेट देणार्‍या ३ लाख लोकांना होणार आहे.

याबरोबरच आता १० महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन्सवर गुगलने पब्लिक वायफाय सुविधा सुरू केल्यामुळे दररोज १५ लाख भारतीयांना याचा लाभ घेता येणार असून, हा जगातील सर्वांत मोठा सार्वजनिक वायफाय प्रकल्पाचा भाग आहे. जानेवारीमध्ये मुंबई सेंट्रलपासून सुरू झालेल्या या प्रकल्पामध्ये आता पुणे, रांची, रायपूर, भोपाळ, भुवनेश्‍वर, विजयवाडा, काचेगुडा(हैदराबाद), एर्नाकुलुम (कोची) आणि विशाखापट्टणम् यांचा समावेश आहे.

या प्रकल्पाला जशी गती मिळेल, तसे २०१६ च्या अखेरपर्यंत भारतातील सर्वांत व्यस्त स्टेशन्स पैंकी १०० स्टेशन्समध्ये ही सुविधा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. या सुविधेचे उद्घाटन लवकरच रेल्वेमंत्री सुरेश प्रभाकर प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Leave a Comment