मुलीचे नांव साईनाईड ठेवण्यास न्यायालयाची बंदी

cynaide
ब्रिटनमधील न्यायालयाने मुलीचे नांव साईनाईड ठेवण्यास आईला बंदी केली असून या नावामुळे भविष्यात या मुलीचे नुकसान होऊ शकेल व त्यामुळे हे नांव ठेवता येणार नाही असे सुनावले आहे. या आईने आपल्या जुळ्या मुलांमधील मुलीचे नांव साईनाईड तर मुलाचे नांव प्रिचर म्हणजे उपदेशक ठेवले होते. मात्र नांव नोंदणी करणार्‍या संस्थेने या विचित्र नावांविरोधात न्यायालयात धाव घेतली असे समजते.

न्यायालयात आपली बाजू मांडताना सबंधित आईने मुलांची नांवे ठेवण्याचा अधिकार पूर्णपणे आईचा असल्याचे सांगितले. ही आई म्हणाली की साईनाईड हे विषाचे नांव आहे याची कल्पना आहे पण याच विषामुळे हिटलर व त्याची प्रेयसी इव्हा यांचा मृत्यू झाला व त्या आनंदात मुलीचे नांव साईनाईड ठेवले. मुलाच्या नावाबाबत ती म्हणाली, प्रिचर म्हणजे उपदेशक. त्याच्या नावातून समाजात अध्यात्माचा संदेश दिला जाऊ शकतो म्हणून हे नांव ठेवले आहे. न्यायालयाने आईचा युक्तीवाद मान्य न करता साईनाईड नावाला बंदी केली.

Leave a Comment