नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून पाकिस्तानने केलेल्या जासूसी कारवायाच्या घटना समोर येताच याची गंभीर दखल घेत भारतीय लष्कराने आपल्या सैनिकांना याबाबत अलर्ट राहण्यास सांगितले आहे.
फेसबुकवरील अनोळखी मुलींपासून सावध रहा
इंडो तिब्बत बॉर्डर पोलिसचे कृष्णा चौधरी यांनी मागील आठवड्यात याबाबत एक आदेश जारी करत सर्व चौक्या आणि संवेदनशील ठिकाणांवर तैनात आपल्या सैनिकांना सांगितले होते की त्यांनी कोणतेही मोबाइल अॅप वापर करू नये कारण असे देखील होऊ शकते की पाकिस्तानमध्ये बसलेला कोणी हॅकर त्यांचा डाटा हॅक करू शकतो. त्याचबरोबर सैनिकांना हे देखील निर्देश देण्यात आले आहेत की फेसबुकवर अनोळखी लोकांची फैंड रिक्वेस्टचा स्वीकार करू नका आणि खासकरून मुलींच्या फैंड रिक्वेस्टपासून जास्त खबरदारी घ्या.