देशाच्या परकीय चलन गंगाजळीत विक्रमी वाढ

gangajali
मुंबई – आठ एप्रिल रोजी समाप्त झालेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलन गंगाजळीत विक्रमी वाढ झाली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही गंगाजळी १५.७४ कोटी डॉलर्सनी वाढून ३५९.९१७ अब्ज डॉलर्सवर पोहोचली असल्याचे समजते. गेल्या आठवड्यातच या गंगाजळीत ४.२ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. सोन्याच्या गंगाजळीत मात्र फारशी भर पडलेली नसून ती २०.११५ अब्जांवर स्थिर असल्याचेही सांगितले जात आहे.

परदेशी चलन गंगाजळीवर युरो, पौंड व येनसारख्या चलनांच्या अमेरिकी डॉलर विनिमय दराचाही प्रभाव असतो व हे दर जसे बदलतील तशी गंगाजळीची रक्कमही बदलत जाते असे तज्ञ सांगतात.

Leave a Comment