तुम्हाला फरशी ऑमलेट खायचे, तर तेलंगणाला चला

omlet
हैदराबाद – उन्हाने तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यात जिवाची लाही लाही केली आहे. दुपारी तर अगदी कर्फ्यु लागल्याप्रमाणे रस्ते मोकळे असतात. पाणी टंचाईचे तर विचारुच नका. एका महिलेने उन्हाची तीव्रता दाखवण्यासाठी एक भन्नाट प्रयोग केला. घराच्या अंगणात असलेल्या फरशीवरच ऑमलेट तयार केले. विशेष म्हणजे यासाठी तिने अग्नीचा वापर केला नाही.

सध्या उन्हाने तेलंगणातील करीमनगर जिल्हा होरपळून निघत आहे. उन लागल्याने अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांचा यात मृत्यूही झाला आहे. एवढी उन्हाची दाहकता येथे दिसून येते. उन्हाची तीव्रता दाखवण्यासाठी एका महिलेने घराच्या अंगणात असलेल्या फरशीवर अंडे फोडले. त्याचे काही मिनिटांत ऑमलेट तयार झाले. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Leave a Comment