अवघ्या १०,९९९ रुपयात लॅपटॉप !

penta
मुंबई : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘शॉपक्लूज’ने ‘पेंटा टी पॅड’ लॅपटॉप लाँच केला असून विशेष म्हणजे या लॅपटॉपची किंमत अवघी १०,९९९ रुपये एवढी आहे. हा लॅपटॉप टॅबलेटच्या रुपातही काम करू शकेल असे कंपनीने म्हटले आहे.

ज्या लॅपटॉप युझर्सना हलका, स्वस्त, मल्टिटास्किंग डिव्हाईस हवा आहे, त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करून कंपनीने या लॅपटॉपची निर्मिती केली आहे. या लॅपटॉपची स्क्रीन १०.१ इंच आहे. तर १२८०×८०० पिक्सल रिझॉल्यूशन असलेल्या या लॅपटॉपमध्ये विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टिम आहे. तर यामध्ये इंटेल एक्स५ प्रोसेसर आहे. या लॅपटॉपची बॅटरी सलग ६-७ तास चालू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय यामध्ये २जीबी रॅम, ३२जीबी रोम असून याची मेमरी २५६ जीबी पर्यंत वाढवता येते. या लॅपटॉपचा रिअर कॅमेरा ५ मेगा पिक्सलचा आहे.

Leave a Comment