कपडेही बनणार डिजिटल

kadhai
तंत्रविज्ञानाच्या युगात आता कपडे हे फक्त शरीर झाकण्यासाठीच नाही तर डिजिटल संदेश आदानप्रदानाचे तसेच तुमच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याचे कामही करू शकणार आहेत. नव्या तंत्रज्ञानानुसार या कपड्यांतच सेंसर व मेमरी डिव्हायसेस लावणे शक्य होणार आहे व त्यामुळे हा कपडा स्मार्टफोन वा अन्य स्मार्ट डिव्हायसेसच्या सहाय्याने संदेश देवाणघेवाण करू शकणार आहे तसेच या कपड्यांपासून बनविलेली बँडेज डॉक्टरांना बँडेज न सोडताही आतील जखम किती भरून आली याची माहिती देऊ शकणार आहेत.

ओहोयो स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधक जॉन बोलकिस यांनी सांगितले की संवाद व सेन्सर जगतात हे ई टेक्स्टाईल तंत्रज्ञान नवीन दारे खुली करेल. यात खास प्रकारच्या शिलाई मशीनने कपड्यावर विशेष संगणक प्रोग्रॅमच्या मदतीने डिटिजल रेषा कपड्याच्या धाग्यातच शिवल्या जातात. या कपड्यापासून बनलेले शर्ट स्मार्टफोन टॅब्लेटसाठी अँटेनाचे काम करतील. भविष्यात चिकित्सा क्षेत्रातही असे कापड क्रांती घडवेल कारण या कपड्यापासून बनलेले बँडेज शरीरावर लावले तर आतील जखम किती भरून आली आहे हे बाहेरूनच सांगू शकेल. तसेच हे कपडे आलेले संदेश एकत्र करणे, फॉरवर्ड करणे ही कामेही करतील.

Leave a Comment